आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Three Brothers Killed 28 Years Old Brother At Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुकानातून 50 हजार रूपये चोरल्याने तिघांनी केला सख्या भावाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील घोरपडी-मुंढवा परिसरात दुकानातून 50 हजार रूपये चोरल्याने तिघा भावांनी आपल्या सख्या भावाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीदरम्यान ही बाब पुढे आली. मुंढवा येथे भावाचा खून करून त्याचा मृतदेह नष्ट करून टाकण्यासाठी ते लोणावळा-खंडाळ्याकडे चालले होते. भैरवराम चौधरी (28) असे मृताचे नाव आहे. तर, त्याचा खून केल्याप्रकरणी अमरराम चौधरी( 32), भरत चौधरी (31) किसन चौधरी (22) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी व मयत हे मूळचे राजस्थानचे आहेत. तसेच त्यांचे घोरपडी येथे हार्डवेअर दुकान आहे. हे चौघेही त्याची देखभाल करत असत. मात्र भैरवरामने सोमवारी रात्री दुकान बंद करताना दुकानातील तिजोरीतून 50 हजाराची चोरी केली. त्यावरून या तिघा भावांनी भैरवरामच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केला. यात भैरवराम जागीच गतप्राण झाला.
मात्र, भैरवरामचा मृत्यू झाल्याचे कळताच या तिघा भावांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एक ओमनी गाडी घेतली व ते लोणावळा-खंडाळाकडे चालले होते. मात्र, लोणावळा शहरात स्थानिक पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी या तिघांना पाहून पोलिसांनी गाडी तपासली असता त्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर चौधरी बंधूंनी घडलेली हकीकत सांगितली. वरील तिघा आरोपींना पोलिसांनी तत्काळ ताब्यात अटक केली आहे.