आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठड्याला धडकून कार पेटली; दरवाजेही लॉक झाले, तीन जणांचा होरपळून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पेटत्या कारमध्ये अडकून पडल्याने तिघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर- कल्याण रस्त्यावर बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, कारचे दरवाजे अचानक लॉक झाल्याने तिघांना बाहेर पडता  आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
 
दिलीप चंद्रराव नवले (४५, रा. बाभुळवाडी, ता. पारनेर, जि. नगर), नरेश सखाराम वाझ (४२, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) व प्रशांत सुरेश चासकर (२३, रा. चासकर मळा, वडगाव अानंद, ता. जुन्नर, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. तिघेही बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास कारने नगर- कल्याण रस्त्यावरून जात होते. या वेळी चासकर  मळ्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जाऊन आदळली. त्यानंतर कारने आतून पेट घेतला. त्यांनी बाहेर  पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचे दरवाजे अचानक लॉक  झाल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
 
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी कारवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत स्थानिक पोलिसांना फोनवरून माहिती दिली. काही वेळानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाला  पाचारण केले. जवानांनी काही वेळात आग आटोक्यात आणल्यानंतर पोलिसांनी कारचे दरवाजे तोडून तिघांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठवले.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडिओ
बातम्या आणखी आहेत...