आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीतील भाविकांच्या बसला अपघात, तिघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर- दक्षिण भारतातील देवदर्शन आटोपून शिर्डीला परतणारी खासगी बस ट्रकवर धडकून तीन भाविक ठार तर 23 जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री 12 वाजता कर्नाटकातील निपाणीजवळील यमगर्णी चेकपोस्ट नाक्याजवळ ही दुर्घटना घडली. मंगेश आण्णा दुशिंग (वय 24, रा. राजवाडा, जि. अहमदनगर), भाऊसाहेब नानासाहेब पगार (वय 44, रा. प्रसादनगर, शिर्डी) आणि मनीषा बाबासाहेब पालवे (वय 62, रा. कल्याण) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शिर्डी येथील साई पारायण सोहळा झाल्यानंतर साईनिर्माण ग्रुपच्या साईसिध्द चॅरिटेबल ट्रस्टचे सुमारे 3 हजार भाविक काशी, रामेश्वरसह दक्षिणेतील अन्य देवदेवतांच्या दर्शनासाठी 15 ऑगस्ट रोजी शिर्डीहून रवाना झाले होते. बेंगळूर, कन्याकुमारी, रामेश्वर, केरळ, मदुराई परिसरातील देवदर्शन आटोपून हे भाविक अनुराधा ट्रॅव्हल्सच्या (एम. एच.04 एफ. के. 115) या खासगी बसने शिर्डीकडे परतत होते. निपाणीकडून कोल्हापूरकडे येताना रविवारी रात्री 12 च्या सुमारास या बसने चेकपोस्ट नाक्याजवळ थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामुळे बसची डावी बाजू कापली गेली. तर थांबलेला ट्रकही पुढच्या थांबलेल्या ट्रकवर जावून आदळल्याने त्या ट्रकचीही समोरची बाजू चक्काचूर झाली.


चालकाच्या झोपेमुळे घात
बसचालक अमोल हा दोन दिवस सलग बस चालवत होता. त्याला आवश्यक विo्रांती मिळाली नव्हती. दिवसरात्र तोच बस चालवत असल्याने झोपेमुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच बसच्या डाव्या बाजूचा दिवा नव्हता, त्यामुळे ट्रक दिसू शकला नाही.