आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे- मुंबई महामार्गावर खासगी बसला अपघात; मतदानासाठी गावी जाणाऱ्या तिघांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर बोरज गावाजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत खासगी बसचा अपघात झाला. त्यात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला तर 7 जण जखमी आहेत. ही घटना आज (सोमवार) सकाळी सात वाजता घडली.

साहिल श्रीपती पवार (वय 16), तानाजी पांडुरंग नाईकवाडे (वय 35), उमेश आबा नाईकवाडे (वय 22, रा. ठाणे मूळ राहणार गाव चरण, ता. शिराळा जिल्हा सांगली), अशी मृतांची नावे असून अन्य 7 जण जखमी आहेत. त्यांची नावे अद्याप समजलेली नाही. ट्रकचालक आहुल बाबू (वय 38 रा चेन्नई) हा सुद्धा घटनेत जखमी झाला असून लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस मुंबईवरून पुण्याकडे येत होती. बसचा क्लच खराब झाल्याने सर्वजण गाडीतून उतरून रस्त्याच्या बाजूला थांबले होते. एकूण 10 जण होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. जखमींना निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. हे सर्व जण सांगलीतील चरण या गावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जात होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघातीची भीषणता दर्शवणारे फोटो...
बातम्या आणखी आहेत...