आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-सोलापूर मार्गावरील अपघातात तिघे ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - भरधाव कारचे पाठीमागील टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पुण्यातील एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले तर एक महिला जखमी झाली. बुधवारी सकाळी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.


पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेले महेंद्र परशुराम वाघमारे (45) हे दोन मुले व पत्नीसह कारने सासुरवाडी कळंब (जि. उस्मानाबाद) येथे यात्रेसाठी चालले होते. सकाळी दहाच्या सुमारास इंदापूरजवळ त्यांच्या कारचे पाठीमागील चाक अचानक फुटले. त्यामुळे नियंत्रण सुटून गाडी चार वेळा पलटी झाली. त्यात महेंद्र वाघमारे, त्यांचा मुलगा आदित्य (वय 16), कौस्तुभ (वय 12 ) हे तिघे जागीच ठार झाले, तर पत्नी अनुराधा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.