आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Murder Incidents Occured In Pune Within 24 Hours

पुण्यात चोवीस तासांत खुनाच्या वेगवेगळ्या तीन घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पुण्यातील वेगवेगळ्या भागांत गेल्या २४ तासांत तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शहरातील राजाराम पुलाजवळ दत्तात्रय माेतीराम पवार (५५) याचा दारूच्या वादातून तर अांबील अाेढ्याजवळ नितीन कसबे (३०) याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला. तिस-या घटनेत कात्रज बाेगद्याजवळ एका अनाेळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. दत्तात्रय पवार खूनप्रकरणी पाेलिसांनी गणेश हाेले याला अटक केली अाहे. रविवारी रात्री होले व पवार यांच्यात मद्यावरून वाद झाला.
त्यानंतर होलेने पवार याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. दुस-या घटनेत चैत्या रंधवे, श्रावण बुरुंगले, काळ्या रंधवे यांनी पूर्ववैमनस्यातून नितीनचा खून केला. तिस-या घटनेत कात्रज बाेगद्याजवळ पोलिसांना एकाचा मृतदेह आढळला.