आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Three Nationalist Congress Workers Arrested In Pune

पुण्‍यात मतदारांना पैसे वाटप करताना राष्ट्रवादीचे ३ कार्यकर्ते अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शास्त्रीनगर भागातील साईनाथ वसाहतीत मंगळवारी राष्ट्रवादीच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. हे कार्यकर्ते येथील मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आले होते, असे सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी या भागातून तिघांनाही अटक केली.
या वेळी त्यांच्याकडून रोख ३० हजार रुपये जप्त करण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. मोहन जगताप (३३), सुभाष दामू शिंदे (४२) व सतीश कोडिंबा सावंत (३७) अशी अटक केलेल्या कार्यकर्त्यांची नावे आहेत.