आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीचा स्लॅब कोसळून 3 मजुरांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातव्या मजल्याच्या स्लॅबला असलेला सपोर्ट काढण्याचा काम सुरु होते. - Divya Marathi
सातव्या मजल्याच्या स्लॅबला असलेला सपोर्ट काढण्याचा काम सुरु होते.
पुणे- दत्तवाडी भागात मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास एका बांधकाम सुरु असणाऱ्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने 3 मजुरांचा मृत्यू झाला आहे. एक मजुर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातव्या मजल्यावरच्या स्लॅबचा सपोर्ट काढल्यावर तो कोसळला. त्याठिकाणी 4 मजुर काम करत होते. ते चौघेही स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यापैकी तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला.  पोलिस उपायुक्त प्रवीण मुंडे घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
 
नेमकी कुठे दुर्घटना घडली?
- पु. ल. देशपांडे उद्यानालगत पाटे डेव्हलपर्सच्या या इमारतीचे काम सुरु आहे. 
- या दुर्घटनेत प्रकाश साव (26), दुलारी पासवान (28) मिथून सिंह (22) यांचा मृत्यू झाला आहे. रामू पासवान (24) हे जखमी झाले आहेत. हे सर्व जण झारखंड येथील आहेत. काही महिन्यापूर्वी बालेवाडी जवळ एका इमारत दुर्घटनेत 9 मजुरांचा मृत्यू झाला होता. 
 
पुढील स्लाईडवर आणखी माहिती आणि फोटो
बातम्या आणखी आहेत...