आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील आकुर्डी लोहमार्गाशेजारी 3 महिन्यांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळला पुरलेल्या अवस्थेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- लोणावळा येथील पांगोळी या गावात जन्मदेत्या आईने पोटच्या अडीच महिन्याचा मुलाला विहिरीत फेकल्याची घटना ताजी असताना आकुर्डी लोहमार्गाशेजारी तीन महिन्याच्या मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

काय आहे हे प्रकरण...?
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या तीन महिन्याच्या मुलीचा मुतदेह आकुर्डी येथील लोहमार्गाशेजारी पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे.
- ही घटना काल ( रविवारी) उघडकीस आली. किवळे येथील जुनवणे वीट भट्टीच्या समोर, आकुर्डी लोहमार्गाच्या शेजारी दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता दुचाकीवरून दोन महिला संशयास्पद जात असल्याचे तेथील नागरिकाने पाहिले होते.
- समक्ष पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीतरी पुरल्याचे नागरिकाच्या लक्षात आले मात्र ही बाब सांगायची कशी या संभ्रमात असलेल्या नागरिकाने आपल्याच पोलिस नातेवाईकाला याची माहिती एक दिवसानंतर दिली आणि समक्ष जाऊन याची पाहणी रात्री 9 वाजता केली.

हे पाहिल्यानंतर लगेचच देहूरोड पोलिसांना या बाबत माहिती दिली त्यांनी ताबडतोब घटनास्थळाची पाहणी केली आणि आज सकाळी नायब तहसीलदार भोसले,पोलिस निरीक्षक अरुण मोरे तसेच देहूरोड पोलिस कर्मचाऱ्याच्या समोर पुरलेल्या तीन महिन्याच्या मुलीचा मुतदेह बाहेर काढला आहे.

या घटनेबाबत तर्क वितर्क लावण्यात येत असून मुलगी झाली म्हणून तिची हत्या करून तर मृतदेह पूरला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच त्या दोन महिला कोण होत्या याबाबत देखील देहूरोड पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...