आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर कार-कंटेनरचा अपघात, तीन जण जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे-मुंबई एक्स्प्रेसवर गुरुवारी रात्री साडेआठ वाजता झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एका स्विफ्ट डिझायन कारने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत कारचा चक्काचूर झाला होता. तर तिघांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते. कारचा पत्रा तोडून तिघांचे मृतदेह बाहेर काढावे लागले. कुठे झाला अपघात...
 
- पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत तळेकर (२७) प्रफुल्ल बिहारी सिद्दामंदी (२५) आणि त्यांचा आणखी सहकारी स्विफ्ट कारने मुंबईहून पुण्याकडे चालले होते.
- एक्स्प्रेस वे वर सोमाटणे फाट्याजवळील टोल प्लाजानजीक एका वळणावर कारने मागून कंटेनरला धडक दिली.
- यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चेंदामेंदा झाला होता.
- तिघांचे मृतदेह कारचा पत्रा कापून बाहेर काढले गेले. त्यांना रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
- अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...