पुणे- आळंदी येथील चावडी चौकातील नगरपालिकेच्या शाळा नं. 2 मधील 3 मुली बेपत्ता झाल्या आहेत. इयत्ता सहावीतील या विद्यार्थीनी आहेत. या मुली बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी साडेदहा वाजता मधल्या सुट्टीत या मुली गायब झाल्या आहेत.
आळंदी पोलिस या मुलींचा शोध घेत आहेत. वैष्णवी शिवशंकर खरात (वय 12, रा. वडगाव रोड, राम मंदिरासमोर), संगिता सोमनाथ साळुंखे (वय 12, रा. 4 नंबर शाळेजवळ, हरिपाठ भवनाजवळ), सलोनी देवेंद्र सिंग (वय. 12, रा. जुन्या बस स्टॅन्डजवळ) अशी बेपत्ता झालेल्या मुलींची नावे आहेत. त्यांच्या पालकांनीही आजुबाजूच्या परिसरात या मुलींचा शोध घेतला. त्यानंतर सय्यद जहीर शफीक (रा. येरवडा) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पुढील स्लाईडवर पाहा बेपत्ता झालेल्या मुली