आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकाेत्तर गणेशाेत्सवाच्या लाेगाेत टिळकांचा फाेटाे नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्याचे अाकर्षण असलेल्या सार्वजनिक गणेशाेत्सवाचे यंदा शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी वर्ष साजरे केले जात अाहे. मात्र, पुण्यातील सार्वजनिक गणेशाेत्सवाचे नेमके जनक काेण? यावरून भाऊ रंगारी मित्रमंडळ व लाेकमान्य टिळक गणेशाेत्सव मंडळात वाद सुरू अाहे. शतकाेत्तर गणेशाेत्सवाच्या निमित्ताने वर्षभर पुणे मनपाने विविध कार्यक्रमांचे अायाेजन केले असून शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शतकाेत्तर गणेशाेत्सव लाेगाेचे अनावरण करण्यात येणार अाहे. मात्र, सदर लाेगाेत गणपतीचा फाेटाे वापरण्यात येणार असून लाेकमान्य टिळकांचा फाेटाे वापरणार नसल्याचे पुणे मनपाने स्पष्ट करत दाेन्ही मंडळांच्या वादावर ताेडगा काढण्याचा प्रयत्न केला अाहे.    

भाऊ रंगारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दावा केला अाहे की, लाेकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशाेत्सव सुरू करण्यापूर्वी दाेन वर्षे भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशाेत्सवाची मुहूर्तमेढ राेवली. त्यामुळे तेच खरे जनक असून त्याबाबतचे पुरावे अामच्याकडे उपलब्ध अाहेत. याला लाेकमान्य टिळक सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळाने अाक्षेप घेत टिळकच खरे सार्वजनिक गणेशाेत्सवाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितल्याने दाेन्ही मंडळांत वाद सुरू अाहेत. पुण्यातील सार्वजनिक गणेशाेत्सवाच्या शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवानिमित्त पुणे मनपाच्या वतीने छापण्यात येणाऱ्या कार्यक्रमपत्रिका, फ्लेक्स यावर लाेकमान्य टिळक यांच्याएेवजी गणपतीचा फाेटाे वापरण्यात येर्इल, अशी सामंजस्याची भूमिका घेतली अाहे.   
 
भाऊ रंगारी मंडळाच्या वतीने निषेध अांदाेलन   
सार्वजनिक गणेशाेत्सवाबाबत खाेटा इतिहास मांडणाऱ्या पुणे मनपा पदाधिकारी, अायुक्त, महापाैर, मुख्यमंत्री, सांस्कृतिकमंत्री यांचा निषेध करण्यासाठी १२ अाॅगस्ट राेजी भाऊसाहेब रंगारी मंडळाच्या वतीने मंडर्इतील टिळक पुतळा येथे निषेध अांदाेलन करण्यात येणार अाहे. 

भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशाेत्सव सुरू केला त्यास २०१६ मध्ये १२५ वर्ष पूर्ण हाेऊन अाता १२६ वे वर्ष सुरू झाले अाहे. मात्र, पुणे मनपा व महाराष्ट्र शासन सत्तेचा दुरुपयाेग करून खाेटा इतिहास जाणीवपूर्वक जनतेपुढे अाणत अाहेत. मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे या प्रकरणाबाबत विनंती व तक्रार केल्यानंतर त्यांनी फक्त नाेंद करून रजिस्टर नंबर दिले अाहेत. ट्रस्टच्या पत्राचे उत्तर कायद्याप्रमाणे त्यांनी देणे अावश्यक असल्याची भूमिका भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने मांडण्यात आली आहे.  

दहीहंडी, गणेशोत्सवात साउंड सिस्टिम बंद   
न्यायालयाने घालून दिलेली डेसिबलची मर्यादा अाणि ती उलटल्यास पाेलिसांकडून हाेणारी कारवाई या पार्श्वभूमीवर पुण्यातील साउंड  अँड  इलेक्ट्रिकल जनरेटर सिस्टिम मालकांच्या संघटनेने दहीहंडी, गणेशोत्सवादरम्यान मंडळांना साउंड सिस्टिम देणार नसल्याची भूमिका घेतली अाहे. साउंड सिस्टिम मालकांच्या या निर्णयाला दहीहंडी समन्वय समितीनेही पाठिंबा देत दहीहंडी उत्सव यावर्षी साजरा न करण्याचा इशारा दिला अाहे. साउंड सिस्टिमच्या भल्यामाेठ्या थप्प्या लावून डाॅल्बीचा दणदणाट करत अावाजाची मर्यादा अाेलांडून ध्वनिप्रदूषण केल्याने डाॅल्बी मालकांना पाेलिसांच्या कारवाईस  सामाेरे जावे लागते. डाॅल्बीच्या व्यवसायावर शहरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम लावले जात असून त्यामुळे व्यावसायिकांवर चुकीच्या पद्धतीचे निर्बंध लावले जात अाहेत. सर्वाेच्च न्यायालयाने डीजे लावण्यासंदर्भात ६५ डेसिबल मर्यादा ठेवली. मात्र, पाेलिसांकडून त्याची माेजणी याेग्य रीतीने न करता अरेरावी केली जात असल्याचे मत असाेसिएशनचे अध्यक्ष उदय शहा यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले अाहे.
बातम्या आणखी आहेत...