आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकास पुण्यात सीसीटीव्हीच्या अाधारे ठोठावणार दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बेशिस्तपणे वाहने चालविणाऱ्या पुणेकरांना वठणीवर अाणण्यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली अाहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास पाेलिस थेट वाहतूकदाराच्या घरी अांतरदेशीय पत्र पाठवून दंड वसूलीची नाेटीस देत अाहेत. पुणे व पिंपरी-िचंचवड मनपाच्या हद्दीत वेगवेगळया ठिकाणी चाैकात एकुण १२३६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले असून त्याच्याअाधारे, सदर चाैकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची माहिती व फुटेज उपलब्ध हाेणार अाहे. त्या अाधारे ही दंडवसूलीची कारवाई करण्यात येईल.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचे नंबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाेलिसांना मिळतील. या क्रमांकावरुन वाहतूक शाखेकडे उपलब्ध असलेले साॅफ्टवेअरद्वारे वाहनचालकाचा नाव, पत्ता मिळू शकेल. त्याच्या अाधारे पाेलिस प्रशासन अांतरदेशीय पत्राद्वारे संबंधित वाहनचालकास नाेटीस बजावतील. यात त्याने वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन केल्याबाबतचा मजकूर, दंडाची रक्कम नमूद करुन उल्लंघन केलेल्या नियमांची माहिती संबंधित वाहनाच्या फाेटाेसह चालकाच्या पत्त्यावर पाठविली जाणार अाहे. संबंधित वाहनचालकाने अांतरदेशीय पत्र मिळाल्यानंतर सात दिवसांचे अात पत्रात नमूद केलेल्या वाहतूक विभागात जाऊन तेथे दंड भरायचा अाहे.

दंड न भरल्यास खटला
सदरचे पत्र मिळाल्यानंतर सात दिवसांचे अात दंड न भरल्यास, सदर वाहनचालकाविराेधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (माेटार वाहन) न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांचे काेर्टात खटला चालविला जाणार अाहे. अांतरदेशीय पत्राद्वारे पत्र पाठवून कारवाई करण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पाेलिस उपअायुक्त डाॅ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...