आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Through The Yog Sadhana They Finding Sucess Ways

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

योगसाधनेतून त्या दोघांनी शोधला यश मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - योगसाधनेचा आधार घेत निराश आणि अपयशी आयुष्यात प्रकाशाचे आणि यशाचे सूर कसे शोधता येतात, हे वेरूळच्या पुंडलिक वाघ आणि दौंड येथील अजिंक्य नेने या युवकांनी सिद्ध करून दाखवले आहे. योगसाधनेचा अंगीकार करून या तरुणांनी आत्महत्येच्या टोकावर उभे राहिलेले आयुष्य आज नव्याने एका वेगळ्या उंचीवर नेले आहे.


ही किमया घडवली पुण्यातील ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. संप्रसाद विनोद यांनी. त्यांच्या शांतिमंदिर गुरुकुलातील वास्तव्यातून हे दोन्ही युवक उच्चशिक्षित तर झालेच, पण आयुष्य संपवण्याच्या विचारात असणा-या या तरुणांनी आज त्यांच्या करिअरमधील यशाची शिखरे गाठली आहेत. औरंगाबादच्या वेरूळ येथील पुंडलिक वाघ या तरुणाने गुरुकुलात राहून, येथील शिस्तबद्ध पण प्रेमळ वातावरणात योगसाधना करून आपले निरर्थक वाटणारे जगणे अर्थपूर्ण केले. एमबीए होऊन आज तो यशस्वी उद्योजक बनला आहे.


दौंड येथील अजिंक्य नेने हा तरुण विज्ञान शाखेच्या दुस-या वर्षात नापास झाला होता. निराशेमुळे तो खचला. मात्र, डॉ. विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानेही योगसाधना सुरू केली. अल्पावधीतच त्याचा ताण कमी झाला, एकाग्रता, आत्मविश्वास वाढला. तो विज्ञानात द्विपदवीधर झाला. संशोधनकार्यात रमला. जपानमधील छुबु विद्यापीठात नॅनो-बायोटेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी मिळवण्यासाठी जपान सरकारने त्याला वर्षाला 65 लाख रुपयांची मोंबुशु शिष्यवृत्ती मंजूर केली आहे.


दोन्ही विद्यार्थ्यांची आधीची अवस्था आणि आताचे चित्र ही सारी आपल्या प्राचीन योगसाधनेची किमया आहे. कुठलाही बाह्य उपचार न करता, केवळ अंतरंग साधनेने त्यांच्यात हे बदल घडले. यातून आपल्या प्राचीन ज्ञानठेव्याची महानताच पुन्हा प्रत्ययास येते.
डॉ. संप्रसाद विनोद, विश्वस्त - शांतिमंदिर गुरुकुल, पुणे.


आत्मविश्वास वाढला
पुंडलिक आणि अजिंक्य यांनी यशाचे श्रेय डॉ. विनोद यांचे मार्गदर्शन व योगसाधनेला दिले. नियमित ध्यान, प्राणायाम, ओंकार, प्रार्थना करत असताना खिन्नता, निराशा, उदासी दूर झाली. उत्साह, जोम वाटू लागला. अभ्यासात एकाग्रता वाढली आणि आत्मविश्वास कमालीचा वाढला, असे दोघेही म्हणाले.