आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tilak University Registrar Arrested, Woman Rector Molestation Case

टिळक विद्यापीठाच्या कुलसचिवांना अटक, महिला रेक्टरचा विनयभंग केल्याचे प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - महिला रेक्टरचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव उमेश खंडेराव केसकर (५१) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी त्यांना अटकही करण्यात आली. दरम्यान, न्यायालयाने विद्यापीठाच्या आवारात व होस्टेल परिसरात ३० ऑक्टोबरपर्यंत येण्यास मनाई करत केसकर यांना जामीन मंजूर केला.

विद्यापीठातील एक ४० वर्षीय महिला रेक्टर सोमवारी सकाळी केसरकर यांच्या कार्यालयात आल्या होत्या. ‘माझा पगार का कमी झाला आहे? मला त्रास का देता?’ अशी विचारणा त्यांनी केली. या वेळी केसरकर यांनी अश्लील शब्द वापरून आपला हात धरला, अशी तक्रार या महिलेने पोलिसांत दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी भारतीय दंडविधान संहिता कलम ३५४, ३५४ (अ) नुसार केसरकरांवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, नंतर १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली, अशी माहिती स्वारगेट पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक सीमा चौधरी यांनी दिली.

दरम्यान, केसकर यांना २० नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी पोलिस ठाण्यास हजेरी लावण्यास न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच पदाचा गैरवापर करू नये आणि कोणत्याही साक्षीदारावर दबाव टाकू नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असे न्यायालयाने केसकर यांना बजावले आहे.
पुढे वाचा.. जाहिरातीचे पैसे बुडवले, डॉक्टरसह तिघांना कोठडी