आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाहत्यांच्या सेल्फी अाकर्षणामुळे कलाकार असुरक्षित, केतकी माटेगावकरची आयोजकांवर नाराजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे -जळगावच्या बहिणाबाई महाेत्सवासाठी अायाेजकांनी सुरक्षेची हमी दिल्याने मी कार्यक्रमात सहभागी झाले हाेते. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर व्यासपीठावरून खाली जाताना चाहत्यांनी मला घेराव घातला.  काेणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने प्रचंड गाेंधळ उडाला. एखाद्या कलाकारास अामंत्रण दिल्यानंतर त्याच्या सुरक्षेची जबाबदारी अायाेजकांची असते. चाहत्यांच्या वाढत्या सेल्फी अाकर्षणामुळे धक्काबुक्कीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे असुरक्षितता वाटत असल्याचे मत गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर हिने बुधवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.   

या वेळी केतकीचे वडील पराग माटेगावकर, शिवसेना प्रवक्त्या नीलम गाेऱ्हे, शिवसेना चित्रपट सेनाच्या कीर्ती पाठक उपस्थित हाेत्या. या वेळी पराग माटेगावकर म्हणाले, जळगाव येथील कार्यक्रम याेग्यरीतीने पार पडला. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर केतकी व्यासपीठावरून गाडीकडे जात असताना अायाेजकांनी सुरक्षेची व्यवस्था न केल्याने धक्काबुक्की हाेऊन गाेंधळ उडाला.
 
अखेर बाहेरून अालेल्या महिलांनी कडे करून केतकीला सुखरूप गाडीपर्यंत पाेहोचवले. सेल्फीच्या अाकर्षणामुळे चाहते असे हुल्लडबाजी करून कलाकारांना धक्काबुक्की करतात. बहिणाबार्इ महाेत्सवाचे अायाेजक दीपक परदेशी यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी अामची मागणी अाहे. याप्रकरणी परदेशी यांच्यावर तत्काळ कडक कारवार्इ करण्यात यावी, अशी मागणी पाेलिस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडे करण्यात अाल्याची माहिती शिवसेना अामदार नीलम गाेऱ्हे यांनी दिली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...