आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • To Know Candidates Who Will Become Chief Minister Of Maharashtra, Divya Marathi

जाणून घ्‍या, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांची ‘कुंडली’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - राज्यात सर्वाधिक काळ राज्य केलेला काँग्रेस, त्यांचा सत्तेतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वाधिक काळ विरोधी पक्ष म्हणून राहिलेले भाजप, शिवसेना यांच्यासह दुसरी सार्वत्रिक निवडणूक लढत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे महाराष्ट्रातील पाच प्रमुख राजकीय पक्ष. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच हे पाचही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जनता कोणाच्या बाजूने कौल देईल, हे १९ ऑक्टोबरला स्पष्ट होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्रिपदावर दावा करणा-या या पाचही पक्षनेत्यांच्या व्यक्तिमत्त्वावर ‘दिव्य मराठी’ने टाकलेला दृष्टिक्षेप.
पृथ्वीराज चव्हाण
वय – ६८ वर्षे
पद – काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री
मतदारसंघ – कराड दक्षिण, जि. सातारा.
शैक्षणिक गुणवत्ता – बिट्स पिलानी येथून बी. ई. (ऑनर्स). त्यानंतर अमेरिकेतून एम.एस. हे पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठी, हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व.
राजकीय प्रवास – राजीव गांधी यांच्या आग्रहाखातर अमेरिकेतील नोकरी सोडून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय. पंतप्रधान कार्यालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सांभाऴला. यासह अनेक केंद्रीय समित्यांवर काम केले. काँग्रेसचे प्रवक्ते, काही राज्यांचे प्रभारी, निवडणूक जाहीरनामा समितीचे प्रमुख आदी जबाबदा-याही पेलल्या. लोकसभा, राज्यसभेत निवडून गेले. संपूर्ण कारकीर्द दिल्लीच्या दरबारी राजकारणात घालवल्यानंतर २०१० मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच आले ते थेट मुख्यमंत्री म्हणूनच. विज्ञान-तंत्रज्ञान आणि प्रशासनात गती असलेला आधुनिक दृष्टीचा हा नेता यंदा प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवत आहे.
अधिक-उणे : ‘निर्णय न घेणारे मुख्यमंत्री’ अशी विरोधक, स्वकीयांकडूनही टीका. मात्र, कधीच संयम सोडला नाही. स्वच्छ, प्रामाणिक चेहरा, मंत्र्यांच्या दबावात येऊन त्यांच्या हिताची कामे न करणारा अशी प्रतिमा.
पुढे वाचा.... देवेंद्र फडणवीसांविषयी..