आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Meeting On Teachers Agitation, Tomorrow Will Be Decision

शिक्षकांच्या आंदोलनाबाबत आज बैठक, उद्या फैसला होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षक संघटनेच्या निर्णयामुळे विद्यार्थी-पालकांसह शिक्षणक्षेत्र हवालदिल झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्यातील विभागीय शिक्षण मंडळांच्या अध्यक्षांची पुण्यात विशेष बैठक होणार आहे. तसेच बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यासंबंधीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 6 फेब्रुवारीपासून, तर मुख्य लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा 3 मार्चपासून आहे. या परीक्षांवर कनिष्ठ महाविद्यालयांतील सुमारे 60 हजार शिक्षकांनी, तर पाच लाख माध्यमिक शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बहिष्कार घातला आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांची द्विधा मनस्थिती झाली आहे.