आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today\'s Leadership Inactive, Sharad Pawar Indirectly Attack On Chavan

आताच्या नेतृत्वाला लकवा भरलाय का? शरद पवारांचा पृथ्‍वीराज चव्हाणांना टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘विलासराव देशमुख लोकांची नस ओळखणारे नेते होते. लोक कागद घेऊन येत तेव्हा ते पानभर कागद वाचत नसत. लोकांना नेमकं काय हवं आहे हे ते दोन मिनिटांत समजून घेत व सही करून मार्गी लावत. आताच्या नेतृत्वाचा हात मात्र का थरथरतो ते माहीत नाही, की लकवा भरलाय? महत्त्वाच्या फाइल्सवर तीन-तीन महिने सह्या होत नाहीत, ही राज्यासाठी चांगली बाब नाही,’ अशा शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी एकीकडे दिवंगत कॉँग्रेस नेते विलासरावांचे गुणगान केले, तर दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना टोले लगावले. ‘आठवणीतले विलासराव’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, विलासराव हे वादातीत नेतृत्व होते. यशवंतराव चव्हाणांच्या दर्जाचे नेतृत्वगुण त्यांच्यात होते.


उत्तम प्रशासक, संसदपटू
महाराष्ट्राच्या उभारणीत विलासरावांचा मोलाचा वाटा आहे. मराठवाड्यापुरता मर्यादित विचार न करता व्यापक विचाराचे भान ठेवल्याने सर्वांचा विश्वास त्यांनी मिळवला. मी मुख्यमंत्री असताना सभागृहात देशमुख आले की मी निश्ंिचत होत असे. कारण त्यांचा प्रत्येक विषयावर परिपूर्ण अभ्यास असे. अनेक प्रश्नांना ते सहजपणे हसतमुखाने उत्तरे देऊन विचारणा-याचे समाधान करत असत. त्यांचे समग्र चरित्र काढून राजकीय लोकांच्या अभ्यासासाठी ठेवावे, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली.


विलासरावांचा राजीनामा फाडला
आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळातील आठवण पवारांनी सांगितली. ‘नव्वदच्या काळात सुशीलकुमार, रामराव आदिक, विलासराव आणि इतर काही मंत्र्यांनी बंड करून मला मुख्यमंत्रिपदावरून घालवावे, अशी मागणी राजीव गांधी यांच्याकडे केली होती. राजीवजींनी मला बोलावून घेतले व तुम्हाला पदावरून काढा म्हणणा-यांचे काय करायचे? असे विचारले. त्यावर ‘त्यांना मंत्रिमंडळातच राहू द्या, ज्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे काम केले त्याचे काय करायचे ते बघून घेईन,’ असे सांगून मी परतलो. दुस-या दिवशी विलासराव केबिनमध्ये आले आणि राजीनामा देऊ केला. ‘तुमच्या नेतृत्वाखाली काम करताना जी काही चौकट मोडली ते पाहता मला मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही,’ असे ते म्हणाले. मात्र मी त्यांचा राजीनामा फाडून टाकला,’ असे पवारांनी सांगितले.