आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुटीसाठी पर्यटकांना हिल स्टेशन्सचे लागले वेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उन्हाची तीव्रता वाढू लागली की, मे महिन्याच्या सुटीत राज्यातील हिल स्टेशन्सचे वेध पर्यटकांना लागतात. सुमारे 60 टक्के पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टसला असते. यंदाही पर्यटकांनी थंड हवेच्या बहुतेक ठिकाणी एमटीडीसीलाच प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.


राज्यात महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, भंडारदरा, चिखलदरा, माळशेज घाट, जव्हार, आंबोली, पन्हाळा, लोणावळा-खंडाळा-कार्ला आणि तोरणमाळ अशी थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यापैकी चिखलदरा, तोरणमाळ आणि जव्हार यांचा अपवाद वगळता बहुतेक थंड हवेच्या ठिकाणी असणा-या एमटीडीसीच्या रिसॉर्टसचे आरक्षण 70 टक्क्यांहून अधिक प्रमाणात करण्यात आल्याची माहिती पर्यटन महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी नयना बोंदार्डे यांनी येथे दिली.
मे महिना हा कौटुंबिक सहलींसाठी राखून ठेवलेला असतो. बहुतेक ठिकाणी परीक्षा उरकलेल्या असल्याने किमान पाच दिवस ते पंधरा दिवस या अवधीच्या सहलींचा ट्रेंड आहे. पाच दिवसांच्या सहलीसाठी कोकणाला प्राधान्य आहे. त्यापेक्षा अधिक दिवसांसाठीची सहल अन्य राज्यांतील पर्यटनस्थळांची असते. शिवाय लग्नसराईचे दिवस असल्याने राज्यांतर्गत प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.


हिल स्टेशन आणि उपलब्ध जागा पुढीलप्रमाणे
महाबळेश्वर - 110 ब्लॉक्स आणि डॉर्मेटरी
माथेरान - 38 ब्लॉक्स, मचाण, (18 बेड्स)
आंबोली - 21 ब्लॉक्स,
भंडारदरा - 21 ब्लॉक्स
पाचगणी - 64 खोल्या आणि 2 डॉर्मिटरीज
पन्हाळा - 21 खोल्या, 4 तंबू - 2 डॉर्मिटरीज
तोरणमाळ - 11 ब्लॉक्स, लाकडी हट्स 8