आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक फेल झाल्याने रेलिंग तोडून दरीत कोसळली बस, थोडक्यात बचावले 50 प्रवाशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वतंत्र्यदिनी सहलीसाठी गुजरातहून आलेल्या पर्यटकांच्या खासगी बसला पुण्यातील लवासा सिटीजवळ अपघात झाला. बस रेलिंग तोडून एका झाडाला धडकली. बस झाडाला धडकली नसती तर खोल दरीत कोसळली असती. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 50 प्रवाशी होते. ते थोडक्यात बचावले. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे हा अपघात झाला.

असा झाला अपघात...
- गुजरातमधील सुरत येथून 50 पर्यटक पुण्यातील लवासा सिटीत ‍फिरायला आले होते.
- टेमघर धरणाजवळील लवासा घाटात बसचे ब्रेक फेल झाले आणि एक वळणावर बस रेलिंग तोडून एका झाडाला धडकली.
- बस झाडाला धडकली नसती तरी थेट खोल दरीत कोसळली असती, असे प्र‍त्यक्षदर्शीने सांगितले.
- बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काडढलेली.
- या अपघातात सुदैवाने कोणलाही दुखापत झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...