आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Towm Planning Celebrating Its Golden Gublee From Today

‘टाऊन प्लॅनिंग’च्या शताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्याचे नगर रचना संचालनालय यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करीत असल्याने सन 2013-14 वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करून बुधवारी शताब्दी वर्षाचा प्रारंभ होणार आहे.

संचालनालयाचे संचालक कमलाकर आकोडे यांनी सांगितले की, या विभागाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे. नगर विकास आराखडे, नकाशे संकेतस्थळावरच उपलब्ध करून दिले जातील. नागरी नियोजन प्रक्रियेत सर्वसामान्यांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वाढती लोकसंख्या व विस्तारणारी शहरे लक्षात घेऊन राज्याच्या नगर रचनेचे व्हीजन डॉक्युमेंट या वर्षात आखण्यात येणार आहे.

सुधारित अधिनियमांची घोषणा, अधिका-यांच्या क्षमतावाढीसाठी प्रशिक्षण आदी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. पानशेत धरण फुटल्यानंतर पुण्यातील पूर, कोयना व किल्लारीचे भूकंप अशा आपत्कालीन प्रसंगी पुनर्वसनाचे आराखडे तत्परतेने बजावण्यात आले. नगर परिषदांच्या हद्दीतील मालमत्तांचे शास्त्रशुद्ध मूल्यांकन केल्याने त्यांचे उत्पन्न वाढल्याचे आकोडे यांनी नमूद केले.