आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कंटनेर उलटला, वाहनांची कोंडी, वाहतूक खंडाळ्याकडून वळवली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक कंटेनर उलटल्यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली. बराच वेळ ही कोंडी हटवण्यात यश न आल्याने संपूर्ण महामार्गावर मुंबईकडे जाणार्‍या वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे अखेर खंडाळ्याकडून वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अमृतांजन पुलाजवळ हा कंटेनर उलटला होता.

कंटेनरचा आकार फार मोठा होता. त्यामुळे जेव्हा कंटेनर पलटी झाला तेव्हा मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर तो आडवा झाला त्यामुळे वाहनांना जायला मार्गच शिल्लक नसल्याचे वाहतुकीची कोंडी झाली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त मात्र नाही.

सोमवार पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात घडला. त्यानंतर अनेक तास वाहतूक खोळंबली होती. कंटेनर हलवण्याचे काम वेगाने करण्यात येत होते. मात्र याला वेळ लागत असल्याने अखेर वाहतूक वळवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...