आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणॆ- मुंबई महामार्ग जाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणॆ - सरकारी कार्यालयांना लागुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीमुळे पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. सुटी आणि पुणॆकरांचे तसे जवळचे नाते आहे. लोणावळा, खंडाळा सगळ्यांचेच आवडते ठिकाण असल्याने सुटीच्या दिवशी येथे मुंबई ,पुण्यातले लोक मजा करायला जात असतात.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महामार्गावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी वाहतुक पोलिस प्रयत्न करत आहेत.