आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्‍मा गांधींवर होता संत तुकारामांचा प्रभाव; पुण्यात या ठिकाणी केले अभंगाचे इंग्रजीत भाषांतर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- महात्‍मा गांधी सगळ्या जगासाठी आदरणीय व्‍यक्‍त‍िमत्‍त्‍व. त्‍यांचे कार्य, दूरदृष्‍टी यामुळेच 'गांधी' हे नाव आता संपूर्ण जगात एक विचारप्रवाह बनले आहे. म्‍हणूनच दहशतवादात होरपळून निघणाऱ्या सबंध जगाला गांधीवादाची गरज भासू लागली आहे.

रक्‍ताचा एक थेंबही न सांडता या महामानवाने मोठी क्रांती केली. पण, निधनाच्‍या 50 वर्षांनंतरही उत्‍सुकता आणि चर्चेचा विषय असलेल्‍या गांधीजींवर कुणाचा प्रभाव होता ? त्‍यांना कुणापासून प्रेरणा मिळत असे. हे जाणून घेण्‍याचे कुतुहल प्रत्‍येकालाच आहे. 2 ऑक्‍टोबरला गांधी जयंती आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com च्‍या वाचकांसाठी गांधीजींच्‍या प्रेरणास्‍त्रोविषयी ही खास माहिती...

गांधीजींवर होता संत तुकारामाचा प्रभाव
समस्‍त जगाला सत्‍य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या गांधीजींवर तथागत गौतम बुद्ध, भगवान महावीर यांच्‍याएवढच जगतगुरू संत तुकारामांचा प्रभाव होता. आपल्‍या भाषणात, व्‍याख्‍यानात ते तुकारामांच्‍या अभंगाचे दाखले देत असत. फावल्‍या वेळात तुकाराम गाथा वाचत असत.

गांधीजींनी केले तुकारामाच्‍या अभंगाचे भाषांतर
गांधीजी 10 ते 28 ऑक्‍टोबर 1930 दरम्‍यान येरवडा कारागृहात होते. या 18 दिवसांत त्‍यांनी तुकाराम महाराजांच्‍या 16 अभंगाचे इंग्रजीतून भाषांतर केले. त्‍यांना संपूर्ण तुकाराम गाथेचे इंग्रजीतून भाषांतर करायचे होते. पण, तसा वेळ गांधीजींना मिळाला नाही. एवढेच नाही तर नागपूरचे डॉ. इंदुभूषण भिंगारे आणि कृष्णराव देशमुख या लेखकद्वयांचा संपादित केलेला 1945 मध्‍ये ‘श्रीसंत तुकारामांची राष्ट्रगाथा’ हा संग्रह प्रकाशित झाला. या ग्रंथाला स्वत: गांधींजीनी प्रस्तावना लिहिली. त्यात “तुकाराम मुझे बहुत प्रिय है.” असे त्यांनी नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर त्या संग्रहाच्‍या मुखपृष्‍ठासाठी तिनिकेतनमधील प्रसिद्ध चित्रकार नंदलाल बोस यांना खास विनंती केली होती. गांधींच्‍याच आग्रहामुळे बोस यांनी या पुस्‍तकासाठी तुकारामांचे चित्र काढून दिले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा गांधीजींनी भाषांतर केलेले अभंग....
बातम्या आणखी आहेत...