आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रवाशाला बेदम मारहाण करुन लुटलं, लुटीनंतर सोडले रस्त्यावरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मारहाण करण्यात आलेला प्रवासी. - Divya Marathi
मारहाण करण्यात आलेला प्रवासी.
पुणे- खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला लुटून बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड हद्दीत रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली आहे. पंकज सुनील कदम असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड हिंजवडी पुलाखाली खासगी वाहतूक करणाऱ्या एका गाडीत पंकज सुनील कदम (वय. 27, रा. मालाड, मुंबई) हे मुंबईकडे जाण्यासाठी बसले होते. गाडीतील व्यक्तींनी सुनील यांना मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यांच्याकडील 1500 रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर त्यांना त्याच गाडीतूनच मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किवळे येथे सोडण्यात आले. जखमी अवस्थेत काही नागरिकांनी पंकज याना खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर खासगी वाहतूक करणारी काळ्या रंगाची गाडी त्या ठिकाणाहून मुंबईकडे फरार झाली. हिंजवडी पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...