आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्व संमेलनापेक्षा ‘टूर’मध्येच जास्त रस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - स्वातंत्र्यवीर सावरकरांना समर्पित करण्यात येणा-या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाचे केवळ निमित्त करून बहुसंख्य मंडळींना अंदमानची ‘टूर’ करण्यात अधिक रस असल्याचे आकडेवारी सांगत आहे. अंदमान येथे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात येणार आहे. या संमेलनाचे संयोजन ‘ऑफबीट डेस्टिनेशन्स’ आणि महाराष्ट्रीय मंडळ, पोर्ट ब्लेअर यांच्याकडे आहे.

विश्व संमेलनात सहभागी होऊ इच्छिणा-यांसाठी प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे. ‘ऑफबीट डेस्टिनेशन्स’तर्फे संमेलनाच्या निमित्ताने ‘अंदमान टूर पॅकेज’ जाहीर करण्यात आले आहे. अंदमानसाठी नोंदणी करणा-यांची संख्या २८ जुलैअखेर १६० इतकी आहे, अशी माहिती ‘ऑफबीट डेस्टिनेशन्स’चे नितीन शास्त्री यांनी दिली. मात्र या १६० जणांमध्ये फक्त एकाच जोडप्याने संमेलनाचे प्रतिनिधी शुल्क भरून नोंदणी केली आहे. उर्वरित सर्व जणांनी (१५८) अंदमानची पॅकेज टूर पसंत केली आहे, असे आकडेवारी सांगत आहे. त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाचे केवळ निमित्त उरणार असून, इच्छुकांपैकी बहुतांश मंडळी ‘टूरटूर’ करत फिरणार,
हे स्पष्ट झाले आहे.