आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck Accident Near Bhimashankar, 5 Died, More Than 40 Injured

वारक-यांचा ट्रक दरीत कोसळला, लातूरचे 5 भाविक ठार, तर 40 हून अधिक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(संग्रहित छायाचित्र)
पुणे- भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन निघालेल्या एका वारक-यांच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा तळेघर-मंदोशी घाटात ट्रक आला असता चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटल्याने 60 फूट खोल दरीत कोसळला. या घटनेत 5 जण ठार झाले असून 40 हून अधिक वारकरी जखमी झाले आहे. हे सर्व वारकरी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील आहे.
वाल्मिकी नागरगोजे (60) लक्ष्मण नागरगोजे (55) नरहरी मोडवे अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. इतर मृतांची नावे समजू शकली नाहीत. वरील सर्व मृत लातूरमधील रेणापूर तालुक्यातील आहेत.
लातूर परिसरातील रेणापूर भागातील वारकरी देवदर्शनासाठी भीमाशंकर येथे आले होते. शुक्रवारी तेथून ते मंचरकडे येत होते. तळेघर- मंदोशी घाटात ट्रक आला असता ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वारक-यांनी भरलेला ट्रक 60 फूट खोल दरीत कोसळला. यात 5 जण ठार झाले आहेत. तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तेथील जवळील मंचर व घोडेगाव येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.