आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित महिला पीएसआयला जाळण्याचा बारामतीत प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाने पोलिस वसाहतीमध्ये घुसून एका निलंबित पीएसआय महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या 5 ऑक्टोबरला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी या पीएसआय महिलेस लाच घेताना पकडले होते. ज्या नगरसेवकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती दिली त्यानेच आपल्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीएसआय दीपाली शिंदे या पीडित महिलेने दिली आहे. यावरून नगरसेवक सुनील पोटे यांच्यासह पाच जणांविरुध्द अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी नगरसेवक सुनील पोटे यांच्याकडे दीपाली शिंदे यांनी वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर पोटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या प्रकरणात 10 हजार रूपयांची लाच घेताना शिंदे या महिलेसह मध्यस्थी करणारा राष्ट्रवादी कॉग्रेसचा पदाधिकारी जाळ्यात अडकला. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केल्यांनर आठवडाभरातच शिंदे यांना जाळून मारण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे, नगरसेवक शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटच्या गोटातील मानले जातात.


नेमके घडले काय?
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास चार-पाच जणांनी शासकीय पोलिस निवासस्थानाचा दरवाजा तोडून घरातील सामानाची मोडतोड करत दिपाली शिंदे व त्यांच्या पतीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही भाजपले आहेत. तीन महिन्यापूर्वी पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी पोपट गवळी यांनी राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक सुनिल पोटे यांच्याविरूध्द बारामती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी महिला पीएसआय शिंदे आरोपपत्र दाखल करण्यात दिरंगाई करत होत्या व पोटे यांच्याकडे पैशाची मागणी करत होत्या, असा आरोप आहे. राजकीय वजन वापरल्याने पोलीस कारवाई करत नाहीत. अशी तक्रार पोपट गवळी यांनी थेट उच्च न्यायालयात दाखल केल्याने भितीने पोटे यांनी पीएसआय शिंदे यांना 70 हजार रुपये दिल्याचा आरोप आहे. 5 ऑक्टोबरला संध्याकाळी शिंदे यांना राष्ट्रवादी कॉग्रेसच्या मध्यस्थी करणार्‍या विशाल मेहता या कार्यकर्त्यासह 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांनतर आठवड्यातचहा प्रकार घडला आहे.


तपास सुरू आहे..
दीपाली शिंदे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपाधिक्षक संभाजी कदम या प्रकरणाचा तपास करत आहेत.
रविद्रसिंग परदेशी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक.


सीबीआय चौकशी करा
या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सत्य जनतेसमोर आणवे. संबधित लोकांनी हेतुपुरस्कर हा प्रकार घडवून आणला आहे. सुनिल पोटे, नगरसेवक, बारामती


मला बळीचा बकरा केले
राजकीय दबावाखातर मला बळीचा बकरा बनवले जात आहे. मला जाळण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार कोणालाही अटक केली नाही. याबद्दल कोठेही बोलू नकोस, अशी तंबी वरिष्ठ अधिकार्‍यांनी मला दिली. दीपाली शिंदे, निलंबित पीएसआय