आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tukaram Beej Starts From Today ; Dehunagari Crowded

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुकाराम बीज सोहळा आजपासून ; वारक-यांनी गजबजली देहूनगरी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी(ता. 29) होणार असून राज्यभरातून भाविक देहूनगरीत दाखल झाले आहेत. देहू ग्रामपंचायत आणि संत तुकाराम महाराज संस्थान यांच्या वतीने भाविकांना सुविधा पुरवण्याची लगबग सुरू झाली असून बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.

इंद्रायणीच्या काठी राज्यातील अनेक दिंड्या दाखल झाल्या आहेत. टाळ, मृदंग आणि चिपळ्यांच्या घोषात कीर्तन, प्रवचने सुरू असून तुकोबांच्या अभंगगाथेचा गजर सुरू आहे. संस्थानच्या वतीने देऊळवाड्यात बीज सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे यांनी दिली.

असे होतील बीज कार्यक्रम
पहाटे 3 : देऊळवाड्यात काकडआरती
पहाटे 4 : श्रींची महापूजा, तुकोबा शिळा मंदिरात महापूजा
पहाटे 4.30 : विठ्ठल-रखुमाई मंदिरात महापूजा
पहाटे 5.30 : वैकुंठगमनस्थानी महापूजा
सकाळी 10 : देहूकर महाराजांचे वैकुंठसोहळा कीर्तन
सकाळी 10.30 : पालखीचे वैकुंठगमनस्थानी प्रस्थान
दुपारी - 12.30 : पालखीचे मुख्य देऊळवाड्याकडे प्रस्थान
रात्री कीर्तन, दिंड्यांची भजने व जागर