आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: तुकोबांच्‍या पालखीत बारामतीकर दंग, आज काटेवाडीत रिंगण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- टाळ-मृदंगाचा गजर आणि पखवाजाच्‍या तालावर पावल्‍या करत पंढरीच्‍या दिशेने निघालेल्‍या संत तुकाराम महाराज यांच्‍या पालखी सोहळ्यात आज, बुधवारी काटेवाडीत मेंढ्याचे रिंगण होणार आहे. त्‍यानंतर इंदापूर तालुक्‍यातील सणसर येथे पालखीचा मुक्‍काम होईल.
मंगळवार- बारामतीमध्‍ये मुक्‍काम..
मंगळवारी बारामतीमध्‍ये पालखीचा मुक्‍काम होता. बारामती तालुक्‍यातील उंडवडी सुपे येथील मुक्‍काम आटोपून पालखी बारामतीमध्‍ये दाखल झाली. दिवसभर हजारो वारक-यांनी पालखीच्‍या दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी विविध भक्‍तीमय कार्यक्रमात बारामतीकर दंग झाले होते.
जल्‍लोषात स्‍वागत..
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी रथाचे बारामतीमध्‍ये जल्‍लोषात स्‍वागत करण्‍यात आले. नगर परिषदेसमोरील शारदा प्रांगणातील शाही शामियान्‍यात पालखीच्‍या मुक्‍कामाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, बारामतीमध्‍ये तुकारामांच्‍या पालखीचे असे झाले स्‍वागत..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...