आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहूतून तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, वारकरी भक्तीरसात चिंब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराजांच्‍या पालखी दर्शनासाठी वाकर-यांनी केलेली गर्दी. - Divya Marathi
महाराजांच्‍या पालखी दर्शनासाठी वाकर-यांनी केलेली गर्दी.
पुणे – देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने बुधवारी दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. तुकोबांची पालखी भजनी मंडपाच्या बाहेर येताच वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे भक्तीच्या रसात बुडालेले वारकरी पावसाने चिंब झाले. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी, पिकांबरोबरच शेतक-यांचे चेहरेही सुकून गेले होते. मात्र, पावसाचे आगमन झाल्याने वारक-यांसह शेतक-यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. देहूतून संत तुकोबांची पालखी बाहेर पडून इनामदार वाड्यात विसावेल. पालखी प्रस्थान व तुकोबाच्या दर्शनासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
दरम्यान, प्रस्थानाआधी पहाटे साडेचारपासून सुरू विधी सुरु झाले होते. वारीच्या ओढीने लक्षावधी वारक-यांचा मेळा देहू-आळंदीत भरला होता. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट यांच्या हस्ते पादूका पूजन झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी मंत्री हर्षवधन पाटील, बबनराव पाचपुते, माजी आमदार उल्हास पवार, देहूनगरीचे सरपंच कांतिलाल काळोखे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालखी विषयी जाणून घेण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा