आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंढेंचा धडाका; बीआरटी मार्गावर घुसखोरी करणाऱ्या वाहनांची घेतायेत नोंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे. - Divya Marathi
पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे.
पु्णे- किवळे-सांगवी बीआरटी मार्गावर रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून ये-जा करणाऱ्या सुमारे 200 वाहनांना बुधवारी पीएमपीच्या सुरक्षा पथकाने अटकाव केला. संबंधित वाहनांवर कारवाई करण्यासाठी संबंधित वाहनांची छायाचित्रे काढून व क्रमांक नोंदवून घेण्यात आले आहेत. 
 
रावेत येथील महिलांनी बेशिस्त वाहनचालकांविरोधात आंदोलन केल्यानंतर त्याची दखल घेत पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पाठवले. बीआरटी लेनमधून वारंवार खासगी वाहने ये-जा करीत असल्याने पुण्यात अनेकदा अपघात होत असतात. त्याविरोधात रावेत भागातील सेलेस्टियल सिटी सोसायटीमधील महिलांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते. 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...