आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इये इंदापूरनगरी रंगला रिंगण सोहळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंड्या-पताका झळकावत, टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात मंगळवारी संतर्शेष्ठ श्री तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर शहरात दाखल झाली. रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबा कदम विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळय़ाचे दुसरे रिंगण पार पडले. ग्यानबा- तुकारामच्या घोषात दंग झालेल्या वारकर्‍यांनी शिस्तीत रिंगणाची रचना केली.

चोपदाराचा इशारा झाला अन् टाळकरी बेफाम धावले. मागोमाग पखवाजवादक, डोक्यावर तुळशीवृंदावन, कलश घेतलेल्या महिलांनीही फेरी पूर्ण केली. या रिंगण सोहळ्यात मानकरी अश्वांसोबतच इंदापूर तालुक्यातील आणखी दोन अश्व सहभागी झाले होते. दोन दिवसांच्या इंदापूर मुक्कामानंतर गुरुवारी पालखी सराटी गावाकडे मार्गस्थ होईल. तर माऊलींची पालखी मंगळवारी फलटण मुक्कामी होती.
(फोटो - रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबा कदम विद्यालयाच्या प्रांगणात पालखी सोहळय़ाचे दुसरे रिंगण.छाया : अंगद तावरे)