आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हरिनामाच्या गजरापुढे घाटातील डोंगर ठेंगणा, तुकोबारायांची पालखी आज बारामतीत येणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘मार्गी बहुत । याचि गेले साधुसंत ।। नका जाऊ आडरानेंय । ऐसी गर्जती पुराणें ।। चोखाळिल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ।। झळकती पताका । गरूडटकें म्हणे तुका ।।’ यांसारख्या अनेक अभंगांचा व तुकोबांचा जयघोष करत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखीने गुरुवारी दौंड तालुक्यातील पहिलाच अवघड चढणीचा रोटी घाट पार करून बारामती तालुक्यात प्रवेश केला. हरिनामाच्या नामघोष करत वारकर्‍यांमध्ये संचारलेल्या उत्साहापुढे घाटातील डोंगरदेखील ठेंगणा वाटत होता.

वरवंड येथून गुरुवारी सकाळी निघालेल्या तुकोबांची पालखी रोटी घाटातील अवघड चढणीला सुरूवात केली होती. पावसाची चिंता वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत असली तरी नामस्मरणाने वरुणराजाला साकडे घालण्याचा ते प्रयत्न करताना दिसून आले. टाळ- मृदंगाचा गजर, फुगडी खेळून अवघड घाटाची वाट ते सोपी करत होते. शुक्रवारी सकाळी पालखी बारामतीत येईल. प्रशासन तसेच सेवाभावी लोकांनी वारकर्‍यांच्या सेवेत कुठेही कसर पडू दिली नाही.

छायाचित्र - माउलींच्या पालखीत नेत्यांची ‘यात्रा’
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरुवारी सकाळी जेजुरीहून वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या वारीत सहभाग घेतला. हरिनामाचा जयघोष करत दौंडज खिंडीत त्यांनी वारकर्‍यांसोबत न्याहारीचा आस्वादही घेतला.