आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Tukoba Dnyaneshwar Palkhi News In Marathi, Divya Marathi, Pune

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: हरिनामाच्या गजरात दुमदुमली अलंकापुरी, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे प्रस्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शुक्रवारी आषाढी वारीसाठी आळंदीहून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. ढगाळ वातावरणात दाटून आलेल्या सांजसमयी सहा वाजून वीस मिनिटांनी पालखी सोहळ्याने विठ्ठलाच्या वाटेवर प्रस्थान ठेवले. यावेळी हरिनामाच्या गजराने अलंकापुरी दुमदुमूून गेली होती.

शुक्रवारी पहाटेपासूनच माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याची लगबग सुरु झाली. पहाटे पावणेतीन वाजता समाधी मंदिरातील घंटानादाने आळंदीला जाग आली. उत्साहात काकड आरती झाली. त्यानंतर माऊलींची पंचामृत पूजा व अभिषेक झाला. पहाटे साडेचारपासून दुपारी साडेअकरापर्यंत हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.
पुढे वाचा...