आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान आठ जुलैला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू येथून आठ जुलै रोजी प्रस्थान करणार आहे. अधिक मास येत असल्याने यंदा पालखी सोहळा २० दिवस उशिरा होणार आहे.
संस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकानुसार तुकोबांच्या पालखीचे जुलैला परंपरेप्रमाणे विधिवत पूजन होऊन प्रस्थान होईल. दुपारी अडीचच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याची सुरुवात होईल आणि पहिला मुक्काम देहू येथील इनामदार वाड्यात होईल. यंदा तुकोबांच्या पालखी सोहळ्याचे ३३० वे वर्ष आहे.

पालखी सोहळ्याचा प्रवास
जुलैदेहूमधून प्रस्थान
जुलै आकुर्डी
१० जुलै पुण्यात मुक्काम
१२ जुलै लोणी काळभोर
१३,१४ जुलै यवत, वरवंड
१५ जुलै उंडवडी
१६ जुलै बारामती
१७,१८ जुलै सणस, अथुर्णे
१९ जुलै निमगाव केतकी
२०, २१ जुलै इंदापूर, सराटी
२२ जुलै अकलूज
२३ जुलै बोरगाव
२४ जुलै पिराची कुरोली
२५, २६ जुलै वाखरी, पंढरपूर
बातम्या आणखी आहेत...