आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पुण्‍यात कारच्या धडकेत मायलेकीचा मृत्यू; चालक महिलेला त्वरित जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशिता आणि पूजा विश्वकर्मा अशी मृतांची नावे आहेत. - Divya Marathi
इशिता आणि पूजा विश्वकर्मा अशी मृतांची नावे आहेत.
पुणे- बाणेर येथे रस्ता अाेलांडण्यासाठी दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना भरधाव कारने भीषण धडक दिल्याचा प्रकार साेमवारी घडला हाेता. या अपघातात तीन वर्षांची  मुलगी इशिका विश्वकर्मा हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला हाेता, तर गंभीर जखमी झालेली तिची अाई पूजा अजयकुमार विश्वकर्मा  (२४) हिचा साेमवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला अाहे.
 
या प्रकरणी कारचालक महिला सुजाता जयप्रकाश श्राॅफ (रा.शिवाजीनगर, पुणे) हिला अटक करण्यात अाली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चाैधरी यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली अाहे. सुजाता ही पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी अाहे.

आरोपी महिला बांधकाम व्यावसायिकाची पत्नी...
आरोपी महिला एक बांधकाम व्यावसायिकाची पत्नी असल्याचे समजते. अपघातात चालक महिलाही जखमी झाली आहे. अपघातानंतर महिला कारमधून उतरत जवळच्याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली आहे.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...