आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात सोन्यांच्या बनावट बिस्किटांची विक्री; दोघांना अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पैशांची गरज असल्याचे भासवून कमी किमतीत सोन्याची बनावट बिस्किटे विक्री करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुनसरीफ झुबेरखान (मु.रा.कैथवाड,राजस्थान) व वसीमखान पुष्कर खान (रा.राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिल कुºहाडे यांनी फिर्याद दिली होती.

कुºहाडे रस्त्यावरून जात असताना त्यांना दोघांनी अडवून पैशाची गरज असल्याने सोन्याची बिस्किटे विक्री करायचे असे सांगितले. मात्र, कुºहाडे यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली.