आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Killed In Tempo Car Accident At Pune Mumbai Highway

टेम्पो- कारच्या धडकेत पाथर्डीच्या दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - टेम्पो-कारच्या अपघातात तीन ठार, तर पाच जण जखमी झाल्याची घटना जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरील कान्हे फाट्याजवळ गरुवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली. भाऊसाहेब घोडके, सुभाष बताणे (रा. रांजणी, ता. पाथर्डी) आणि तानाजी बाबूराव खाडे (रा. खोपोली) अशी मृतांची नावे आहेत.

मृतांतील दोघे व जखमी झालेले पाचही जण पाथर्डी (जि. नगर) येथील आहेत. त्यांच्यावर सोमाटणे येथील बडे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुंबईहून वेगाने टेम्पो येत होता. या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो दुभाजक तोडून समोरून येणा-या कारवर आदळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी मोटारीमधून मृतदेह बाहेर काढले, तर जखमींना रुग्णालयात दाखल केले.