आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे-जेजुरी मार्गावरील शिंदवणे घाटात फॉर्च्युनर गाडीत महिलेवर सामूहिक बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे(उरुळी कांचन)- पुणे-जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये काल (शुक्रवारी) मध्यरात्रीच्या सुमारास दोन नराधमांनी एका महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
       
पीडित महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे उभी होती. यावेळी फॉर्च्युनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी तिला शिंदवणे घाटात नेवून तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिला घाटातच सोडून पसार झाले. पीडितेने घाटातून जाणार्‍या दोन दुचाकीस्वरांच्या मदतीने फॉर्च्युनर गाडीचा नंबर मिळविला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहे.
बातम्या आणखी आहेत...