आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात एटीएम फो़डण्याचा प्रयत्न, पोलिस चौकीजवळ चोरट्यांचा धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील शनिवारवाड्याजवळ असलेल्या दोन एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र चोरट्यांना त्यात यश आले नाही. अॅक्सिस बँक आणि डीसीबी बँकेची ही एटीएम होती. दरम्यान, ही घटना व मागील काही दिवसातील देशातील घटना पाहता एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे.
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास कसबा पेठ पोलिस चौकीपासून 100 फूटांच्या अंतरावर असलेल्या एटीएममध्ये चेहरा बांधलेल्या दोन भामट्यांनी प्रवेश केला. सुमारे दोन तास ते एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते. या एटीएमसाठी असणा-या सुरक्षारक्षकाला मारहाण करून एटीएमच्या आतील रूममध्ये शांत बसण्यास सांगितले. दरम्यान हे चोरटे नवोदित असावेत. कारण ते 20 वर्षाच्या वयोगटातील वाटत होते. तसेच दोन तास झोंबूनही चोरट्यांना यश मिळाले नाही. विशेष म्हणजे त्यांनी कॅमे-याच्या वायर्स तोडण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचा सगळा प्रताप सीसीटीव्हीत कैद होत होता.
पुण्यात गेल्या वर्षीही असाच झाला प्रयत्न, वाचा पुढे...