आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांना काही महत्वपूर्ण धागेदोरे मिळाले असून तपास पथके त्यादृष्टीने तपास करत आहेत. धागेदोरे शेवटपर्यंत जात नाही व याप्रकरणी कोणाला अटक होत नाही, तोपर्यंत याबाबत आणखी काही सांगणे कठीण आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांना सदर तपासात यश आले नाही हे खरे असले तरी हत्येचा कट अतिशय गुप्तपणे रचण्यात आल्याचे सकृतदर्शनी दिसते. या प्रकरणाच्या तपासाची मी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून माहिती घेतली असून त्यांना काही धागेदोरे उपलब्ध झालेले आहे. परंतु ते आताच जाहीर केले तर त्याचा पुढील तपासावर परिणाम होऊ शकतो. सदर गुन्ह्यातील हल्लेखोर हे सराईत असून त्यांनी पूर्वनियोजित कटानुसार डॉ.दाभोलकर यांची हत्या घडून आणली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिस वाहनाच्या धडकेने बालिका जखमी
मुख्यमंत्री चव्हाण हे बालगंधर्व रंगमंदिर येथील एका बचतगटाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी येत असताना त्यांच्या ताफ्यातील एका पोलिस वाहनाने बालगंधर्व प्रवेशद्वारवर आईसोबत उभ्या असलेल्या एका बालिकेला जोरात धडक दिली. यात मानसी बनसोडे ही चिमुरडी जखमी झाली असून तिला संचेती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलीची व तिच्या आईची भेट घेऊन विचारपूस केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.