आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two More Days Rain In State, Predict Weather Department

राज्यात आणखी दोन दिवस पाऊस, हवामानशास्त्र विभागाने वर्तवला अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - देशाच्या उत्तर भागात थंड हवेची लाट आली असताना दक्षिण भारत मात्र अवेळी पावसाच्या छायेखाली आला आहे. पुढच्या दोन-तीन दिवसांत विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीपपासून उत्तर गुजरातपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांत मध्य-महाराष्ट्रात
ब-याच ठिकाणी, कोकण-गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात वाहून येणा-या बाष्पयुक्त ढगांमुळे राज्यात ही अवस्था निर्माण झाली आहे. फुलो-यात आलेल्या रब्बी पिकांसाठी आणि प्रामुख्याने आंबा व द्राक्षबागांसाठी
पाऊस आणि ढगाळ हवामान त्रासदायक आहे.

देशाच्या विविध भागात सध्या हवामानाची विचित्र अवस्था पाहण्यास मिळत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम राजस्थान या भागात थंडीचा प्रकोप वाढला आहे. त्याचवेळी बिहार, आसाम, मेघालय या राज्यांमध्ये धुक्याची दाट छाया पसरली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, अंदमान-निकोबार बेटे तसेच महाराष्ट्र, गोवा आणि केरळ या दक्षिणेकडील राज्यांमध्ये सर्वत्र पावसाळी वातावरण आहे.

गेल्या २४ तासांतील किमान तापमान
मुुंबई - २३.८, रत्नागिरी - २१.१, नगर १७.२, जळगाव - १७.६, महाबळेश्वर १६.६, मालेगाव - १९, नाशिक - १७, सोलापूर २०.७, उस्मानाबाद - १७.७, औरंगाबाद - १८, परभणी - १९.२, नांदेड - १७, बीड - १९.८, अकोला - १७.९, अमरावती - १६.२, नागपूर - १४.२.