आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेणावळ्यात दाेन फेरीवाल्यांना पेटवले, एकाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो. - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो.
पुणे - लाेणावळा येथील रेल्वे वसाहतीत दाेन फेरीवाल्यांना झाेपलेल्या अवस्थेतच पेटवून देण्यात अाले. त्यात अतुलसिंग जगजितसिंग भदाेरिया (२०) या फेरीवाल्याचा मृत्यू झाला तर सचिन प्रताप सिंग (२२) हा गंभीररीत्या जखमी झाला अाहे. बुधवारी पहाटे ही घटना घडली. अाराेपी अमित अजमेरसिंग भदोरिया यास पाेलिसांनी अटक केली असून त्याचा फरार झालेला साथीदार सनी विजयपाल सिंग याचा शाेध घेतला जात अाहे.

अतुलसिंग व सचिन हे रेल्वेमध्ये फिरते विक्रेते असून ते लाेणावळ्यातील रेल्वे वसाहतीतील बराक चाळीत ते भाड्याने राहतात. दाेन नाेव्हेंबर राेजी त्यांचे अाराेपी अमित व सनी यांच्याशी रेल्वेत पाणी विक्रीच्या कारणावरून भांडण झाले हाेते. त्यानंतर बुधवारी पहाटे सव्वादाेनच्या सुमारास ते झाेपलेल्या अवस्थेत असतानाच त्यांच्या अंगावर अाराेपी व्यक्तींनी पेट्राेल टाकून त्यांना पेटवून देत िजवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत अतुलसिंग ९० टक्के भाजल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर सचिन हा ८५ टक्के भाजला असून त्यास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे.