आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Punekar Youth Come Into National Defence Academy's Merit List

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गुणवत्ता यादीत दोन पुणेकर युवकांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमेश डोंगरे - Divya Marathi
प्रथमेश डोंगरे
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या 131 व्या तुकडीसाठी प्रथमेश डोंगरे आणि करण कातोरे या दोन पुणेकर युवकांची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नुकत्याच जाहीर केलेल्या निकालात अखिल भारतीय गुणवत्ता यादीत हे दोघे झळकले आहेत. प्रथमेशने अखिल भारतीय स्तरावर 105 वे तर करणने 264 वे स्थान मिळवले आहे. या दोघांनाही प्रशिक्षणासाठी पुण्याच्या अ‍ॅपेक्स करिअरतर्फे कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर, कमांडर (निवृत्त) प्रदीपकुमार बॅनर्जी आणि हृषीकेश आपटे यांचे मार्गदर्शन मिळाले.
प्रथमेश पुण्याच्या मुकुंदनगर येथील रहिवासी असून त्याचे शालेय शिक्षण मराठी माध्यमात झाले आहे. सध्या तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षात शिकत आहे. प्रथमेशने तिस-या प्रयत्नांत एनडीए प्रवेशाचे स्वप्न साकार केले आहे. करण कातोरे हा 19 वर्षांचा युवक जुनी सांगवी येथील असून त्याने पहिल्याच प्रयत्नात एनडीएमध्ये प्रवेश मिळवला आहे. जानेवारी 2014 पासून हे युवक एनडीएमधील प्रशिक्षणाला सुरुवात करणार आहेत. एनडीए प्रवेशासाठी देशभरातून चार लाख विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 85 हजार तरुण उत्तीर्ण झाले होते. मात्र प्रत्यक्ष मुलाखतीत अवघे 469 तरुण यशस्वी झाले.