आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकर हत्या प्रकरण: दोन संशयित ताब्यात, अहमदनगरमध्ये दुचाकी जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर/पुणे- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना अद्याप अगदी ठोस काही हाती लागले नसले तरी मारेक-यांपैकी एकाच्या रेखाचित्राशी मिळताजुळता चेहरा असलेल्या तरुणासह दोन दुचाकीस्वारांना पोलिसांनी बुधवारी सकाळी नगरमध्ये ताब्यात घेतले. दोघांनाही पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तरुणांकडील दुचाकीच्या समोरच्या नंबर प्लेटवर ‘एमएच 12 बीडब्ल्यू 8566’, तर मागच्या बाजूला ‘एमएच 2 डब्ल्यू 856’ असा क्रमांक आहे. पुण्याहून औरंगाबादकडे जात असताना मार्केट कमिटीसमोर दोघांना कोतवाली पोलिसांनी पकडले. झडती घेतली तेव्हा त्यांच्या खिशात पुण्याच्या पीएमटीची तिकिटे व दोन सिमकार्डही सापडली. चौकशीत आपण नांदेडचे असल्याचे तरुणांनी सांगितले असले तरी त्यांच्या भाषेवरून दोघेही उत्तर प्रदेशातील असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. उपअधीक्षक श्याम घुगे यांनी या संशयितांची चौकशी केली. पुण्याचे पथक बुधवारी रात्री नगरला आले. दोघांनाही घेऊन पुण्याला रवाना झाले.