आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: उत्तर भारतात फिरायला गेलेल्या माजी नगरसेवकासह उद्योजकाचा दुर्देवी मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत अलोक बाफना... - Divya Marathi
मृत अलोक बाफना...
पुणे- हिमाचल प्रदेशात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या चिंचवडमधील एका उद्योजकाचा दरड कोसळल्याने दुर्दैवी सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला. अलोक बाफना (वय- 35, रा. वुडस् सोसायटी, काळेवाडी) असे या उद्योजकाचे नाव आहे. चिंचवड येथील सूर्या ट्रान्सपोर्टचे बाफना हे मालक होते.
बाफना हे पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सदस्य होते. गेल्या वर्षी माळीण येथे झालेल्या दुर्घटनेत त्यांनी मदतकार्यात दोन दिवस सहभाग घेतला होता. तसेच त्यासाठी जेसीबी, पोकलंड व इतर साहित्य उपलब्ध करून दिले होते. संपूर्ण राज्यामध्ये त्यांचा मित्र परिवार पसरलेला होता.
बाफना हे मागील आठवड्यात चिंचवड गावातील आपल्या पाच-सहा मित्रांसह हिमाचल प्रदेशात फिरण्यासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ते आपल्या फॉर्च्यूनर गाडीने स्पिटी व्हॅली परिसरात परयटन करीत होते. तेथून परतत असताना त्यांच्या गाडीवर दरड कोसळली. त्यात दरडीतील एक भलामोठा दगड ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या बाफना यांच्या डोक्यावर आदळला. यात डोक्याची कवटी फुटल्याने बाफना यांचा जागीच मृत्यू झाला.
तर, दुस-या घटनेत पुण्यातील धनकवडी परिसरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय नांदे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नांदे हे अमरनाथ यात्रेसाठी गेले असता बद्रीनाथ येथे त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यातच मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. नांदे हे मित्रांसमवेत अमरनाथ यात्रेला गेले होते. शनिवारी रात्री मुंबईहून विमानाने ते श्रीनगरला गेले. रात्री तिथे मुक्काम करून रविवारी त्यांनी अमरनाथच्या दिशेने कुच केले. सोमवारी रात्री त्यांनी सोनमर्गजवळील बालताल येथे मुक्काम केला. मंगळवारी सकाळी त्यांच्या सोबतचे काही मित्र घोडयावरून पुढे गेले. रामदास गाडे यांच्यासह नांदे चालत निघाले होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास बालताल येथे काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांच्या छातीमध्ये दुखू लागले. त्यानंतर त्यांना लगेच रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज दुपारी श्रीनगरहून विमानाने त्यांचा मृतदेह पुण्यात आणण्यात येणार आहे असे अशी माहिती त्यांच्यासोबत गेलेले मित्र अमित काळे यांनी दिली आहे.