आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरींची काळजी न घेतल्याने दोन महिलांवर गुन्हा दाखल; 29 मांजरींची घरातून सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- कोंढवा परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील दोन महिलांनी हौसेने पाळलेल्या २९ मांजरांच्या  फौजेची योग्य निगा न राखल्याने पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी या महिलांची नावे आहेत. सोसायटीतील फ्लॅटमध्ये  या महिलांनी मांजरे पाळली. मात्र, पण काही दिवसांनी या मांजरांची देखभाल करणे सोडून त्यांना फ्लॅटमध्ये कोंडून त्या दुसरीकडे राहू लागल्या. 
 
दरम्यान, मांजरांना कोंडल्याने त्यांची  उपासमार सुरू झाली. तसेच त्यांच्या  मलमूत्राची दुर्गंधी सोसायटीभर पसरली. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आणि  प्राणिमित्र संघटनेकडे संपर्क साधून त्यांनी पोलिसांत या महिलांविरोधात  तक्रार केली. त्याची दखल घेत पोलिसांनी आधी २९ मांजरी ताब्यात घेतल्या. सध्या या मांजरी पोलिस ठाण्यात आहेत. मात्र, काही दिवसांनी या मांजरी प्राणिमित्रांकडे देण्यात येणार असल्याचे समजते. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी शेजाऱ्यांनी पाळलेल्या मांजरींचा बंदोबस्त करावा, या  मागणीसाठी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतरही वाद झाला होता.
बातम्या आणखी आहेत...