आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांची पाेलिस काेठडी, पुण्यात राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्याचे प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ नाटककार व कवी राम गणेश गडकरी ऊर्फ गाेविंदाग्रज यांचा छत्रपती संभाजी उद्यानातील पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या चार कार्यकर्त्यांना पाेलिसांनी अटक केली अाहे. बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी.गुळवे पाटील यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा जानेवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.  हर्षवर्धन महादेव मगदूम (रा.बालाजीनगर, पुणे), प्रदीप भानुदास कणसे (रा.नऱ्हे अांबेगाव, पुणे), स्वप्निल सूर्यकांत काळे (रा.चऱ्हाेली, पुणे) व गणेश देविदास कारले (रा.चांदूस, ता. खेड, पुणे) अशी अटक करण्यात अालेल्या अाराेपींची नावे अाहेत. त्यांच्याविराेधात डेक्कन पाेलिस ठाण्यात छत्रपती संभाजी उद्यानाचे उद्यानप्रमुख अशाेक घाेरपडे  यांनी िफर्याद िदली अाहे.

अाराेपींनी तीन जानेवारीच्या मध्यरात्री उद्यानातील चाैथऱ्यावरील नाटककार राम गडकरी यांचा अर्धपुतळा हाताेडा व कुऱ्हाडीचे घाव घालून खाली  पाडला. तसेच गडकरी यांनी संभाजी महाराजांबाबत आपत्तीजनक लिखाण केले म्हणून त्याबाबतची व्हिडिअाे क्लीप तयार करून ती व्हाॅट्सअॅपद्वारे प्रसारित केली. बुधवारी चौघांना न्यायालयात हजर करण्यात आले.  सुनावणीदरम्यान सरकारी वकील म्हणाले, आरोपींकडे पुतळा  तोडण्यासाठी वापरण्यात  आलेली हत्यारे जप्त करायचे आहेत. तसेच या घटनेमागे कोण आहे,  याबाबत तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगितले. युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्वांना ६ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, अाराेपींना पाेलिस काेठडी न देता जामीन द्यावा ही  बचाव पक्षाकडून करण्यात अालेली विनंती मात्र न्यायालयाने फेटाळली.
बातम्या आणखी आहेत...